“ ईशा म्हणजे निर्मितीचे सूत्र. क्रिया म्हणजे त्या करिता शरीरांतर्गत केलेली हालचाल. ईशाक्रिया हे असत्या कडून सत्याकडे नेणारे एक साधेसोपे परंतु शक्तिमान अस्त्र आहे.”
- सद्गुरु
आरोग्याचे तंत्रज्ञान
पुढे काय..?
ईशायोगाचा परिचय करून देणारे कार्यक्रम.
ईशा फौंडेशन तर्फे मुख्यत्वे करून अध्यात्मिक प्रगती साठी अनेक प्रकारच्या साधना, क्रिया आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
ईनर इंजिनिअरिंग एक सखोल अभ्यासक्रम असून, योजनाबद्धपणे आयुष्यांतील उच्च ध्येय्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला योगसाधनेच्या आंतरीक जाणीवेतून मार्गदर्शन करतो. हाच कार्यक्रम नेटवरून ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे. www.innerengineering.com
शरीर आणि मनावर नियंत्रण ठेवून आयुष्याचा आनंददायक अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी हटयोगामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या अनेक आसनक्रिया आहेत. < p>
प्रत्येकाला चांगली स्मरणशक्ती, मानसिक एकाग्रता, दूरदृष्टी आणि उच्च प्रतीचे शारीरिक व मानसिक संतुलन ह्याचा लाभ व्हावा ह्या हेतूने, लहान मुलांसाठी असलेल्या ईशायोगामध्ये कला, क्रीडा आणि योगक्रिया ह्यांचा समावेश आहे.
फायदे
आरोग्य
- वाढीव शरीरक्षमता आणि ओजवृद्धि
- ताणतणाव कमी होणे
- मानसिक एकाग्रता व मानसिक संतुलन राखणे.
- कार्यप्रवणता वाढून, दिवसभर टिकून राहणे.
- झोप आणि विश्रांतीची गरज कमी होणे.
- अस्थमा सारखे जुनाट विकार, रोगप्रवणता, दमा, मधुमेह, संधिवात, अपस्मार / फेफरे, पाठदुःखी, मणक्याचे विकार, नाकाचे आजार, अनपेक्षित रक्तदाब, त्वचा आणि डोळ्यांचे विकार, अर्धशिशी इ. दीर्घकालीन आजारांपासून संरक्षण मिळते.
सादरीकरण
- मिळते तणावयुक्त परिस्थिती हाताळण्याची क्षमता वाढविते.
- दूरदृष्टी, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविते.
- कार्यशीलता आणि उत्पादनक्षमता वाढविते.
- आपापसांतले संबंध आणि संपर्क वाढविते
- दिवसभर जास्तीत जास्त कार्यप्रवण राहणे.
अनुभव
- सकारात्मक भावना आणि मोकळ्या मनाने आयुष्याकडे बघण्याचा प्रयत्न करणे.
- आयुष्यांतील ध्येय आणि भावनिकता ह्यांचे मुल्यमापन करणे.
- मानसिक शांतता आणि समाधान मिळवा
- मानसिक भीती आणि बंधनांच्या मर्यादा पार करा
- प्रत्येक क्षणाचा पुरेपूर अनुभव घेत जगा
|