“ ईशा म्हणजे निर्मितीचे सूत्र.
क्रिया म्हणजे त्या करिता शरीरांतर्गत केलेली हालचाल. ईशाक्रिया
हे असत्या कडून सत्याकडे नेणारे एक साधेसोपे परंतु शक्तिमान अस्त्र आहे.”

- सद्गुरु

आरोग्याचे तंत्रज्ञान

ईशाक्रिया विषयी लोक काय म्हणतात ते वाचा.

" मी गेले पांच महिने ईशाक्रिया करीत आहे आणि काही लक्षणीय बदल मी अनुभवले आहेत. माझे विचार आणि प्रश्न दिवसेंदिवस कमी होऊ लागले असून प्रत्येक घटनेविषयी औत्सुक्य थांबले आहे. आयुष्याविषयी कोठलाही संभ्रम राहिला नाही. सगळे कसे सुसंगत झाले आहे." - मेरी, कोलोराडो, अमेरिका.

“ मी नुकतीच ईशाक्रिया साधना केली आणि सद्गुरुंच्या (व्हिडिओ) छायाचित्रित मार्गदर्शनांत सुद्धा किती शक्ती आहे याची मला प्रचिती आली. खचितच मला एक आंतरिक मनःशांतता, वैचारिक समन्वय ह्याचा अनुभव आला आणि वस्तूनिष्ठ आकर्षणापासून दूर जात असल्याची जाणीव झाली." – ओल्गा अव्हिला , हौलंड.

" मी आज ईशाक्रिया साधना केली आणि माझ्या डोळ्यांतून अश्रुंचा पूर सुरु झाला. मला काहीतरी जाणवू लागले. एक तीव्र मानसिक ईच्छा झाली कि ह्या आनंदांत आणखीन काही काळ बसून रहावे. " – अपर्णा, भारत

"मला मदत केल्याबद्दल सद्गुरूंना धन्यवाद. मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये मी फ्लोरिडा मध्ये ईनर इंजिनीअरिंग चा कोर्स केला आणि मानसिक शांतता प्रस्थापित होऊन परतले. परंतु डिसेंबर मध्ये गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर माझे मन आणि पूर्ण शरीर अडचणींत होते. केवळ ईशाक्रिया साधनेची ध्वनिफित ऐकून पुनःश्च पहिल्यासारखी मनःशांती मिळू लागली ." – गिल जोन्स, अमेरिका.

" ईशाक्रिया एक आश्चर्यकारक साधना आहे. एक अतिशय साधी, सोपी, सरळ प्रक्रिया असली तरी सहजपणे अंतर्मनाचा खोलवर ठाव घेत जागृत करणारी आहे. मला तरी असे वाटते कि शांभवी मुद्रा, शक्ती चालना क्रिया आणि शून्यचिंतन ह्यांच्या बरोबरीने ईशाक्रिया चांगल्या प्रकारे सामावून गेली आहे. em> – डॉं. नादेश, मलेशिया

" ह्या वर्षी मार्च महिन्यात माझ्या एका मित्राच्या आग्रहाखातर मी (ईशायोगाचे संस्थापक) सद्गुरूंचे प्रवचन ऐकण्यासाठी गेले होते.थोडीफार योग साधनेची माहिती सोडल्यास, मला फक्त थोडीफार योगाची माहिती होती पण ध्यानधारणा किंवा अध्यात्मचिंतन ह्याचा काहीही अनुभव नव्हता. त्यांनी तेथे अध्यात्मिक चिंतनाचे जे तंत्र शिकविले ते खरोखर आश्चर्यकारक होते. केवळ एका छोटया सत्रामध्ये मला आंतरिक मनःशांती म्हणजे काय ते समजले. ज्यामुळे माझ्या वैयक्तिक अडचणीच्या काळांत, माझ्या अपेक्षे पेक्षा जास्त समर्थपणे मी तोंड देऊ शकले. सद्गुरूंना विनोदाची जाण आहे. आयुष्य आणि जगाकडे बघण्याचा त्यांचा स्वतःचा एक दृष्टीकोन आहे आणि मला वाटते कि प्रत्येकाला त्यांचे कडून काही चांगले शिकून घेण्यासारखे आहे." - अलिडा होर्ने,(कायदा सचिव) पेनसिल्व्हानिया, अमेरिका

ईशाक्रिया - तुमचा अनुभव कथन करा


Please let us know your name.

Invalid Input

Invalid Input

 
 
ISHA FOUNDATION
Isha Foundation - A Non-profit Organization © Copyright 1997 - 2019. Isha Foundation. All rights reserved
Site MapFeedbackContact UsInternational Yoga Day View our Copyright and Privacy Policy