“ ईशा म्हणजे निर्मितीचे सूत्र
क्रिया म्हणजे त्या करिता शरीरांतर्गत केलेली हालचाल. ईशाक्रिया हे
असत्या कडून सत्याकडे नेणारे एक साधेसोपे परंतु शक्तिमान अस्त्र आहे.”

- सद्गुरु

आरोग्याचे तंत्रज्ञान

नेहमी विचारले जाणारे प्रश्न:

 • ह्या आध्यात्मिक चिंतनाचे फायदे का?
 • ह्या ध्यान धारणेमुळे काय साध्य होऊ शकते..?
 • ईशा क्रिया करण्याची आवश्यकता किमान वय काय आहे?
 • हा कार्यक्रम ऑनलाईन विनामूल्य कां दिला जात आहे..?
 • श्वासोच्छवासाचे नक्की महत्व काय आहे.? फक्त शरीर निरोगी राखण्या खेरीज श्वासोच्छवासाचे वेगळे काही महत्त्व आहे काय..?
 • मान कलती करून चेहेरा किंचित वर उचलणे का आवश्यक आहे..?
 • आ S S S आ " असे म्हणण्याचा माझ्यावर काय परिणाम होऊ शकतो..?
 • ईशाक्रिया करण्यासाठी पोट रिकामे असणे आवश्यक आहे काय. . ? हि अध्यात्मिक क्रिया आणि खाणे ह्यामध्ये किती वेळेचे
 • अध्यात्मिक चिंतन काही ठराविक वेळ करायचे असते का ? किंवा दररोज ठराविक वेळेस असे पूर्ण उर्वरित आयुष्यभर करायचे असते .?
 • मी ईनर इंजिनिअरिंगचा कोर्स पूर्ण केला असून दररोज नियमितपणे क्रिया करीत आहे. " शांभवी मुद्रा " हि क्रिया करताना त्याच्या बरोबर मी " ईशाक्रिया " करणे आवश्यक आहे काय.? जर ह्या दोन्ही क्रिया नियमितपणे दररोज केल्यास त्या माझ्यासाठी फायदेशिर ठरतील काय.?
 • "आ " म्हंटल्या नंतर मला कंपने जाणवतात आणि खूपच प्रसन्न वाटते. हा मंत्र मी ७ पेक्षा जास्त वेळा म्हणू शकतो का.? किंवा एक स्वतंत्र क्रिया म्हणून त्याचे पुनर्मंथन करू शकतो काय.?
 • प्रत्येकजण ईशाक्रिया करू शकतो का ? किंवा काही अशा व्याधी / आजार आहेत कि जे असताना अध्यात्मिक चिंतन करणे योग्य नसते.? मला सर्व्हायकल स्पौंडीलायटिस आहे आणि मला समजून घ्यायचे आहे कि मी ईशाक्रिया करणे सुरक्षित आहे काय ?
 • मी माझ्या कुटुंबियांना तसेच मित्र/मैत्रिणीना हि क्रिया शिकवू शकतो कां ? किंवा त्यांना व्हिडिओ बघणे आवश्यक आहे .?
 • मी जेंव्हा " आ " म्हणतो तेंव्हा कंठ आणि ह्रदयचक्रांत मला कंपने जाणवतात, परंतु " मणिपूर " चक्रांत संवेदना होत नाहीत. माझे काहि चुकते आहे काय.?
 • मी मांडी घालून बसू शकत नाही, तरी ईशाक्रिया करताना पाठीचा काना ताठ ठेऊन खुर्चीवर बसल्यास चालेल काय.?
 • हि अध्यात्मिक क्रिया मी कोठे करू शकतो.? माझ्या राहत्या घराभोवती प्रचंड आवाज आणि गोंगाट असतो. ह्या क्रियेच्या अभ्यासा साठी मला वेगळ्या जागेची सोय करणे आवश्यक आहे काय.?
 • मी ईशाक्रिया नेटवरून ऑनलाईन शिकलो आणि त्याचा सराव नियमितपणे दररोज करीत होतो, परंतु काही कारणास्तव त्यांत खंड पडला. मला माझा सराव पुनश्च करायचा आहे. त्याकरिता पुनः ऑनलाईन क्लासमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे काय ? किंवा मी माझा सराव पूर्वी शिकल्या प्रमाणे सुरु ठेवावा ?
 • ईशाक्रिया करण्यासाठी योग्य वेळ कोणती.?
 • मी दिवसांतून किती वेळा ईशाक्रिया करू शकतो. . ?
 • सुरुवातीस आपण हि क्रिया ४८ दिवस नियमितपणे दररोज करणे का आवश्यक आहे.?

आपले प्रश्न येथे पोस्ट करा

 • सद्गुरु : सर्व प्रथम, आध्यात्मिक चिंतन करण्याची काय आवश्यकता आहे..? तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात जाणीवपूर्वक ठरवून केलेली नसून ती तुमच्या बाबतीत घडली आहे. तुम्ही जन्माला आलांत तेंव्हा तुमचे शरीर अगदी छोटेसे होते आणि आता त्याची वाढ झाली आहे. अर्थातच हे शरीर म्हणजे काहीतरी असे जे तुम्ही जमा केलेले आहे. तो एक साठा आहे. थोडक्यांत ज्याला तुम्ही शरीर असे म्हणता, ते म्हणजे जमा झालेले अन्न आहे. त्याच प्रमाणे ज्याला तुम्ही मन असे संबोधिता, ते म्हणजे अर्थातच जमा झालेले संस्कार आहेत.

  आतुम्ही जेजे काही साठवून ठेवता ते अर्थात तुमचेच आहे, पण ते म्हणजे कधीही तुम्ही नव्हेत. ज्या अर्थी तुम्ही सांठविलेत/जमा केलेत, म्हणजेच ते कोठूनतरी बाहेरून आणलेत. आज तुम्ही ७० किलो शरीर जमा केलेले आहे, तेच तुम्ही ६० किलो सुद्धा करू शकता. परंतु ते कमी झालेले १० किलो शोधत बसत नाही, कारण ते साठविलेले होते म्हणून. एकदा ते कमी झाले कि गेले. त्याचप्रमाणे तुमचे मन म्हणजे सुद्धा आठवणींचा एक सांठाच आहे.

  ज्या क्षणी तुम्ही स्वतःला स्वानुभवांतून ओळखता, ज्या क्षणी तुम्हाला जाणवते कि ते म्हणजे तुम्ही नाही आहांत ; त्याच क्षणी तुमचा स्वतःविषयीचा भ्रम दूर होतो. तुमची स्वतः विषयीची कल्पना बदलते. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते कि हे तुमचे शरीर ज्याला तुम्ही माझे म्हणता ते सुद्धा बाहेरून जमा केलेले आहे. ज्या क्षणापर्यंत तुम्हास मनापासून वाटते कि हे मन म्हणजे 'मी', तोपर्यंत तुम्हाला तुमचे आयुष्य वास्तविकते मध्ये जसे आहे तसे अजून समजलेच नाही असे म्हणावे लागेल. तुम्ही तुमचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी आवश्यक तेवढीच आयुष्याची जाणीव बाळगता, परंतु प्रत्यक्षांत ते जसे आहे त्याची काहीच कल्पना नाही.

  एकदा तुम्ही मानव जन्मांत आलांत कि तग धरून जगणे आलेच, पण केवळ जिवंत राहणे म्हणजेच सर्वस्व नव्हे. तुम्ही जर दुसऱ्या कोठल्याही प्राण्याच्या जन्माला आला असतात तर केवळ पोट भरणे हेच आयुष्य झाले असते. परंतु एकदा तुम्ही मनुष्यप्राणि झालांत कि आयुष्य म्हणजे केवळ जीवंत राहणे इतकाच त्याचा अर्थ होत नाही. कारण प्रत्यक्षांत दैनंदिन गरजा पूर्ण झाल्यावरच माणसाच्या जगण्याची सुरुवात होते.

  ध्यानधारणा, अध्यात्मिक चिंतन - ह्यामुळे एका आंतरिक अनुभूतीची जाणीव होऊ लागते. जेणेकरून स्वतः तुम्ही, आणि तुमचे ह्यामधील फरक लक्ष्यांत येऊ लागतो. स्वतः तुम्ही आणि जमा केलेले तुम्ही, ह्यामध्ये फारच थोडे अंतर, अगदी थोडा फरक आहे आणि आपण असे म्हणूया कि केवळ अध्यात्मिक चिंतनामुळे हा फरक तुमच्या लक्ष्यांत येत आहे. ह्यालाच अध्यात्मिक चिंतनाचा परिणाम असेही म्हणता येईल.

  हे करण्याचा उपयोग काय . ? ह्या मुळे आकलनशक्ती दृढ होऊन त्यांत स्पष्टता येते. तम्ही तुमचे आयुष्य जसे आहे तसेच बघता आणि कोठल्याही प्रकारे चित्त विचलित न होता बघू शकता. सध्यातरी आजच्या जगांत जे तुम्हाला डोळ्यासमोर स्पष्ट दिसते आहे - तेच तुमचे जग आहे. माझ्या विचारांत तरलता आणि सत्यवचन नसेल ; तर मग जरी कितीही दृढ आत्मविश्वासाने मी बोलत राहिलो तरी ती केवळ एक मूर्ख बडबड ठरेल.

  एकदा हे तुमच्या लक्ष्यांत आले कि मग तुम्हाला सगळेच स्पष्ट समजून घ्यावेसे वाटू लागते आणि आयुष्य जसे आहे तसेच बघणे योग्य वाटू लागते. कारण कोठेही न अडखळता -थांबता - शक्यतो कमीतकमी संघर्ष करीत आयुष्य जगण्याची तुमची ईच्छा असते.

 • सद्गुरु: हि क्रिया नियमितपणे करीत राहिल्यास तुम्ही आणि तुमचे शरीर, तसेच तुम्ही आणि तुमचे मन ह्या दरम्यान एक अंतर निर्माण होईल. तुमच्या आयुष्यांत जर कोठलाही संघर्ष असेल तर तो केवळ तुम्ही स्वतःला त्या गोष्टींशी निगडित समजत असता म्हणून, ह्या सर्व गोष्टी म्हणजे तुम्हीच असा विचार करत असता म्हणून.

  अर्थात चिंतनाचे मूळ सार हेच आहे कि त्यामुळे तुम्ही आणि तुमचे मन ह्यामधला फरक स्पष्ट होऊ लागतो. तुम्ही अनुभवत असलेली सर्व दुःखे आणि अडचणी ह्या तुमच्या मनांतूनच निर्माण होत असतात. मग आता सांगा - तुम्ही स्वतःला ह्या मनापासून दूर नेलेत तर कोठलीही दुःख किंवा अडचणी शिल्लक राहतील का...? येथेच सर्व दुःखांचा अंत होतो.

  आता तुम्ही आणि तुमचे मन ह्यांत अंतर असल्याने, तुम्ही जेंव्हा चिंतन करता तेंव्हा तुम्हाला शांत वाटु लागते. फक्त अडचण इतकीच आहे कि मिटलेले डोळे उघडताच ; तुम्ही पुनःश्च मनाशी निगडीत होऊन जाता.

  तुम्ही जर नियमितपणे दररोज चिंतन कराल तर एक दिवस निश्चित असा येईल कि तुम्ही डोळे उघडाल आणि तुम्हाला जाणवेल कि तुम्ही येथे आहांत आणि तुमचे मन दूर त्या तिथे आहे. येथेच दुःखांचा शेवट होतो. स्वतःचे शरीर आणि मन ह्यापासून स्वतःला दूर नेऊ शकल्यास, तुम्ही तुमच्या शरीरांतर्गत असणाऱ्या मूळ सूत्रांच्या संपर्कांत याल आणि एकदा का हे घडले, कि तुमच्यावर कृपा झालीच म्हणून समजा. तुम्हाला औचित्याची जाणीव होईल आणि तुमच्यावर दुसरा कोठलाही प्रभाव राहणार नाही.

  ह्याचा अर्थ असा कि तुमच्या आयुष्यांतील भूतकाळाचा तुमच्यावरील प्रभाव संपला. आता तुमच्यावर त्याचा कोठलाही परिणाम राहणार नाही. आता भूतकाळ तुमच्या अस्तित्वाच्या मध्ये येत नसल्यामुळे तुमचा प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण सुद्धा प्रचंड सामर्थ्यशाली संधी निर्माण करू शकतो. तुम्ही येथे आलांत, येथपर्यंत आलांत कि - आयुष्य म्हणजे एक अमर्याद, निरंकुश झालेले जीवन असेल.

  तुम्हाला औचित्याची जाणीव होईल आणि तुमच्यावर दुसरा कोठलाही प्रभाव राहणार नाही.

 • वयाच्या १२ वर्षाच्या वरील कोणीही ईशा क्रिया सराव करू शकता.

 • सद्गुरु: काही वर्षांपासून कोठल्याही अथक प्रयत्नांशिवाय किंवा दुसरे कोठलेही कारण घडले नसताना बसल्या जागीच मी अथांग ब्रह्मानंदांत बुडू लागलो. स्वतःशीच मी विचार केला कि त्यांत विशेष ते काय ? अमर्याद आनंदांत बुडून मी फक्त येथे बसून राहिलो आहे. त्यांत मोठस काय ? संपूर्ण जगाला ह्या अमर्याद आनंदांत मला सहभागी करून घेता आले पाहिजे. मी हा असा येथे दाढी वाढवून बसल्याला आता जवळपास ३० वर्षे होत आली पण लोकांनी त्यांच्या नैराश्याला / दुखांना कवटाळणे सोडलेले नाही. काही दशलक्ष लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो असलो तरीही ते म्हणजे पूर्ण जग नव्हे. जगांतील सर्व लोक म्हणजे ७ अब्ज एवढी तरी लोकसंख्या असावी असे मला वाटते.

  अलिकडे दिवसेंदिवस सभोवतालचा समाज लहरी किंवा नादिष्ट होऊ लागल्याचा प्रत्यय येत आहे. कारण सर्व प्रकारची भौतिक सुखे उपभोगुन झाली ; आता पुढे काय करायचे हे मात्र कोणालाच माहित नाही. आगळ्या वेगळ्या केशरचना करणे, अंगावर पायापासून डोक्यापर्यंत गोंदवून घेणे, ह्या पेक्षा आणखिन वेगळे ते काय करणार ? आणि केवळ काहीतरी नवीन करायचे म्हणून लोक आयुष्याच्या विरुद्ध अशा नकारार्थी गोष्टी करू पहात आहेत. कारण काय तर त्यांना काहीतरी वेगळे करायचे आहे, काहीतरी नवीन करायचे आहे म्हणून..!

  थोडक्यात म्हणजे समाज आता अध्यात्मिक प्रक्रिया आत्मसात करण्यासाठी परिपक्व झाला आहे. आता जर त्याला योग्य आदर्श दिला नाही तर त्याचा विस्फोट होईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर एखादी प्रक्रिया समोर आणली पाहिजे ; परंतु धार्मिक नाही - तर एखादी अशी अगदी साधी अध्यात्मिक प्रक्रिया, कि जी कोठल्याही विशिष्ट तत्वज्ञान किंवा आदर्शवादाचा पुरस्कार करणारी नसून सुद्धा जी प्रामाणिकपणे सर्वांना अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करेल.

  आजपर्यंत कदाचित छोट्या प्रमाणांत समूहांना कल्पना दिली गेली असेल, परंतु मोठ्या प्रमाणावर हे अद्यापहि घडू शकलेले नाही. आता मात्र अत्याधुनिक संपर्क यंत्रणा व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे आपण घडवून आणले पाहिजे. ह्या पिढीचे म्हणून एक अतिशय महत्वाचे असे हे कार्य आपण पूर्ण करुया. हे आपले अहोभाग्य म्हणायचे, कि संपूर्ण मानवजातीला मोठ्या प्रमाणावर सद्सदविवेक बुद्धीची जाणीव करून देण्याचे जनजागृतीचे कार्य आपण करणार आहोंत.

  तुम्ही सर्वांनी मिळून आधुनिक तंत्रज्ञानाने जर मोठ्या प्रमाणावर कारखान्यांची उभारणी केलीत तर आपल्याला कदाचित ह्या ग्रहावरची पूर्ण जागा देखिल अपुरी पडेल. मानवी शक्तींना आता अंतर्मुख होऊन कार्य करणे आवश्यक आहे. म्हणजे ते स्वतःला घडविण्याचे कार्य हाती घेतील आणि त्यामुळे बाह्य सृष्टीचा नाश थांबेल. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचे मुख्य काम अजून बाकी आहे. आपण जर हे कार्य मोठ्या प्रमाणावर हाती घेतले नाही तर ह्या ग्रहावर कार्यरत असणारा उद्योगप्रणित समाज आणि त्यांचे उद्योग ; ह्या ग्रहाचा सर्वनाश ओढवून आणतील.

 • सद्गुरु: तुम्हाला तुमच्या शरीराशी बांधून ठेवणारा श्वासोश्वास हा एक धागा आहे. मी जर तुमचा श्वास काढून घेतला तर तुम्ही आणि तुमचे शरीर एकमेकांपासून वेगळे होतील. हा श्वासोच्छ्वास तुम्हाला तुमच्या शरीराशी जोडून ठेवत असतो. ज्याला तुम्ही 'मी' आणि 'माझे शरीर ' म्हणता, त्या दोघांना ह्या श्वासाने बांधून ठेवले आहे आणि आत्ता तुम्ही कोण आहांत ह्याचे स्वरूप हा श्वासच अनेक अंगांनी ठरवित असतो.

  वेगवेगळ्या वैचारिक आणि भावनिक पातळीवर असताना, तुमचा श्वासोच्छ्वास विविध प्रकारे होत असतो. तुम्ही रागावलांत कि तुमचा श्वासोच्छ्वास एका प्रकारे चालतो, मात्र तुम्ही शांत असलात कि तो वेगळ्या प्रकारे चालत असतो. तुम्ही आनंदात असलात कि आणखीन वेगळ्या प्रकारे व तुम्ही दुःखी असलात कि अगदी वेगळ्याच प्रकारे चालतो. हे कधी तुमच्या लक्ष्यांत आले आहे का. . ?

  ह्यावर आधारित, परंतु अगदी वेगळ्या अर्थी ह्यालाच आपण प्राणायाम व क्रिया शास्त्र असे म्हणू शकतो. लक्षपूर्वक ठराविक पद्धतीने नियमित श्वासोच्छ्वास केल्यास आयुष्याविषयी तुमचे विचार, जाणीव, समाज आणि अनुभव बदलतील.

  शरीर आणि मनाशी निगडीत आणखिन काही गोष्टी करण्यासाठी हा श्वासोच्छ्वास एक अस्त्र म्हणून अनेक प्रकारे वापरता येईल. ईशाक्रिया करताना तुमच्या लक्ष्यांत येईल कि ईशाक्रिया मध्ये आपण एक साधी सोपी श्वास प्रक्रिया अवलंबित असलो तरी हि क्रिया म्हणजे श्वासोच्छ्वास नव्हे. श्वासोच्छ्वास हे एक अस्त्र आहे. ईशाक्रिया स्थापित करण्यासाठी श्वासोच्छ्वास आहे पण नंतर जे काही घडते - अनुभवास येते ; ते मात्र श्वासोच्छ्वासा मुळे नसते.

  तुम्ही ज्याप्रकारे श्वासोच्छ्वास करता, तसे तुमचे विचार असतात. तुम्ही जसे विचार कराल, त्याच प्रकारे तुमची श्वासोच्छ्वास प्रक्रिया चालते. आयुष्यभर तुमचे अंतर्मन तुमच्या श्वासोच्छ्वासावर आपला ठसा उमटवून ठेवते.सबब तुम्ही श्वासोच्छवासाचा अभ्यास केल्यास ज्या प्रकारे तुमचा श्वासोच्छवास चालेल त्यांतच तुमचा भूतकाळ , भविष्य आणि वर्तमानकाळ आढळून येइल.

  हे एकदा हे तुमच्या लक्ष्यांत आले कि आयुष्यच बदलून जाईल. केवळ विचार करत बसण्यासाठी नसून, प्रायोगिक तत्वावर हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. येथे बसल्यावर मिळणारा आनंद जर तुम्हाला जाणवला, काहीही न करता - कोठलाही विचार न करता, येथे बसल्या जागी एक जीव म्हणून तो स्वर्गिय अमर्याद आनंद जर तुम्ही अनुभवलांत तर तुमचे आयुष्यच बदलून जाईल.

  एका दृष्टीने हे सर्व अगदी शून्यवत (अशक्यप्राय) वाटते. शास्त्रीय आधार सांगतो कि मद्याचा एक थेंब सुद्धा न घेता किंवा ईतर दुसरे काहीही न घेता ; तुम्ही फक्त येथे बसा आणि ह्या अमर्याद आनंदांत स्वतःच झिंगून जा, बेहोष होऊन जा, धुंद व्हा आणि ते सुद्धा त्याचा शरीरावर कोठलाही विपरीत परिणाम न अनुभवता.. ! तुम्हाला एकदा एक ठराविक जाण निर्माण झाली, कि हि तंत्रप्रणाली अशा प्रकारे तुम्ही आसनस्थ होताच घडवून आणू शकता. येथे आसनस्थ होताच तुम्ही अमर्याद स्वर्गिय आनंदांत बुडून जाल. एकदा का अशा प्रकारे बसल्याजागी श्वासोच्छवास करीत ह्या परमानंदाचा नियमित अनुभव घेऊ लागलात कि आश्चर्यकारकरित्या तुम्ही स्वतः आनंदी व्हाल, परिवर्तनशील व्हाल आणि ह्या सर्वांचे कारण म्हणजे तुम्ही स्वतः मनाच्या उच्चावस्थेंत परिपूर्ण असता. तुमचे मन पूर्वी कधीही नव्हते त्यापेक्षा जास्त चाणाक्ष व क्रियाशील झालेले असते.

 • सद्गुरु: आकाशांत उडणारे काही बघण्यासाठी किंवा कल्पना करून विचार करण्यासाठी डोके वर उचलून बसायला नाही सांगितले. तुम्ही डोके वर उचलून बसलात कि तुमच्या शरीराची ग्रहणक्षमता वाढते. हे एखादी बंद खिडकी उघडण्या सारखे आहे. त्या जगन्नियंत्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. तुम्ही अशाप्रकारे जेंव्हा स्वेच्छेने आनंदज्ञान ग्रहण ग्रहण करण्यास उत्सुक होता, तेंव्हा तुमचे शरीर आपोआपच वर उचलले जाते.

 • सद्गुरु: जेंव्हा आS S S असे म्हणता (जसे फादर मधील फ-आह) तेंव्हा तुमच्या शरीरांतील (प्रतिपाळ केंद्र) काळजीवाहक केंद्र जागृत होते. ह्यालाच मणिपूर चक्र किंवा संपूर्ण शरीराचा केंद्रबिंदू "नाभी"असेही म्हणतात. नाभीच्या खाली केवळ तीन चतुर्थांश इंच अंतरावर मणिपूर चक्र आहे. तुम्ही जेंव्हा आईच्या पोटांत असता तेंव्हा तुम्हाला सर्व पुरवठा करणारी नाळ तेथे जोडलेली असते. आता ती नाळ अस्तित्वांत नाही, परंतु शरीरांतील काळजीवाहक केंद्र मात्र अजूनही तेथेच तुमच्या नाभी जवळ आहे.

  ज्याप्रमाणे आपले एक भौतिक शरीर असते, तसेच एक चैतन्य शरीर देखिल असते. हि ऊर्जाशक्ती ज्याला आपण चैतन्य किंवा प्राणिक शक्ती असे म्हणतो, तिचे अनियंत्रित पणे किंवा अचानक वहन न होता एका ठराविक पद्धतीने आपल्या शरीरांत कार्य करीत असते. वेगवेगळ्या ७२००० मार्गांनी ती आपल्या शरीरांत फिरत असते. थोडक्यांत म्हणजे आपल्या शरीरांत एकूण असे ७२००० मार्ग आहेत, ज्यातून ती वाहत असते, म्हणून नाडी म्हणजे शरीरांतील पाऊलवाट किंवा रुळलेले मार्ग असे समजुया. त्यांना शरीरांत प्रत्यक्ष अस्तित्व नसल्याने, तुम्ही शरीर कापून शोध घेतलांत तर ह्या नाड्या अजिबात दृष्टीस पडणार नाहीत. पण जसजशी तुमची जाणीव वाढत जाइल तसे तुमच्या लक्ष्यांत लागेल कि हि शक्ती वाटेल तशी नव्हे पण ठराविक आंखलेल्या मार्गांवरूनच वाहत असते.

  हे केवळ एकच असे स्पंदन आहे कि ते संपूर्ण शरीरभर पसरते कारण " आ " उच्चारा मुळे मणिपूर चक्र कार्यरत होते.मणीपुरक हे एकच असे केंद्र आहे कि जेथे ७२००० नाड्या एकत्र येऊन त्यांच्या शक्तीचे एकत्रीकरण करून, पुनर्वितरण करतात. तुम्ही जेंव्हा " आ " चा उच्च्चार करता तेंव्हा नाभीच्या तीन चतुर्थौंश इंच खालच्या बाजूला तुम्हाला कंपने जाणवतील आणि हि कंपने शरीरभर पसरतात. हि कंपने तुमच्या शरीरांतील ग्रहणकेंद्र जागृत करण्यासाठी प्रयत्नशील होऊन मदद करतात. हे केंद्र जागृत झाले कि आरोग्य, विद्वत्ता, उत्कर्ष आणि संपन्नता घेऊन येईल.

 • पोट पूर्णतः रिकामे असणे आवश्यक नाही. खाल्यावर काही काळानंतरच क्रिया करावी असेही आवश्यक नाही. भरल्या पोटी तुम्हाला झोप येण्याची शक्यता असते.

 • सर्व ईतर दैनंदिन घटनांप्रमाणेच अध्यात्मिक चिंतनसुद्धा तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होऊ शकते, अगदी दांत घासायच्या संवयी प्रमाणे. सुरुवातीस कोणीतरी आग्रहाने करायला लावते, परंतु एकदा त्याचे महत्व लक्ष्यांत आल्यावर कोठलाही विचार न करता ते आपोआप नियमितपणे होऊ लागते. अध्यात्मिक चिंतनाचे सुद्धा तसेच आहे. तुम्हाला एकदा त्याची आवड निर्माण झाली कि आपोआपच ते तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक घटक होऊन बसते. अर्थात हे होण्यासाठी सुरुवातीस काही दिवस नित्यनेमाने त्याचा पाठपुरावा करावा लागेल, आणि म्हणूनच सुरुवातीचे पहिले ४८ दिवस दररोज किमान दोन वेळा क्रिया करणे आवश्यक आहे.

 • हे दोन्ही क्रिया नियमितपणे दररोज करणे चांगलेच आहे. आपणास त्यापासून निश्चितच फायदा होईल, तरी देखिल वेळे अभावी दोन्ही क्रिया करणे शक्य न झाल्यास, प्राधान्याने " शांभवी महामुद्रा " नियमित करणे जास्त फायदेशिर व महत्वाचे आहे.

 • हे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ईशाक्रिया आणखीन काही वेळा करू शकता, परंतु तुम्हास मंत्रोच्चार जास्त वेळा करायचा असेल तर " ॐ " जास्त योग्य आहे. ईशायोगा सेंटर मध्ये दररोज दु. १२.१५ ते १.३० दरम्यान " ॐ" चा जप सुरु असतो, आपण तेथे येउन सहभागी होऊ शकता. त्याच प्रमाणे तम्ही सेंटर मध्ये होणाऱ्या ईशायोग किंवा ईनर इंजिनिअरिंग ह्या कार्यक्रमांत सहभागी होऊन, शिकून घेऊ शकता. आमचे पुढील कार्यक्रम व माहिती समजून घेण्यासाठी

  www.ishayoga.org येथे पहावे

 • तुम्हाला स्पौंडीलायटिस असुन सुद्धा, ईशाक्रिया साधना करायची असल्यास त्यांत कोठलीही अडचण नाही. हि क्रिया पूर्णपणे सुरक्षित असून फ़ायदेशिर पण आहे. तुम्हाला मांडी घालून जमिनीवर बसने शक्य नसल्यास तुम्ही खुर्ची अथवा बाकड्यावर बसू शकता. फक्त बसताना घोट्याजवळ दोन्ही पाय एकमेकांना स्पर्श करतील एवढी काळजी घ्या. तसेंच तुम्हाला एखादा जुनाट आजार असेल किंवा काही शारीरिक व्यंग असले तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही क्रिया संपूर्ण होईस्तोवर विनाव्यत्यय बसू शकत असाल तर ईशाक्रिया करण्यांत कोठलीही अडचण नाही.

 • त्यांनी ऑनलाईन व्हिडिओ बघून क्रिया शिकणेच योग्य होईल.

 • हे तुम्ही तुमचे तोंड ( आ आ ) संपूर्णपणे उघडले आहे काय ? जर तसे असेल तरच तुम्हाला तुमच्या मणिपूर चक्रामध्ये किंपणे जाणवतील. कदाचित तुम्ही नकळत तुमचे तोंड अर्धवट उघडत असाल. तोंड पूर्णपणे उघडा आणि फरक अनुभवा.

 • मी मांडी घालून बसू शकत नाही, तरी ईशाक्रिया करताना पाठीचा काना ताठ ठेऊन खुर्चीवर बसल्यास चालेल काय.?

 • क्रिया करताना काही अडथळा किंवा निर्बंध येणार नाहीत ह्याची काळजी घेतल्यास , हि क्रिया तुम्ही कोठेही करू शकता. अगदी शांत जागा निश्चितच योग्य स्थळ असेल, परंतु असलीच पाहिजे अशी आत नाही. पर्याय नसल्यास तुम्ही जेथे असाल तेथे क्रिया करू शकता. सगळ्यांत महत्वाची गोष्ट हि आहे कि तुम्ही करायला बसल्यावर मध्येच काही कारणास्तव क्रिया थांबवू नका. कारण क्रिया करताना सभोवतालच्या वातावरणांत निर्माण झालेल्या शक्तीसंचालनांत अडथळा निर्माण होईल.

 • तुम्हाला पूर्वी दिलेल्या सर्व सुचना स्मरत असल्यास आधी शिकविल्याप्रमाणे तुम्ही ईशाक्रिया साधना करू शकता. परंतु पूर्ण सुचना आठवत नसल्यास किंवा कोठलीही शंका असल्यास ; पुनः एकदा ऑनलाईन शिकून मग क्रिया करावी.

 • मध्यरात्रीची वेळ सोडून , तुमच्या सोयीनुसार ईतर कोठल्याही वेळी तुम्ही हि क्रिया करू शकता.

 • मुख्यत्वे करून रोज दिवसांतून २ वेळा - एकदा सकाळी व एकदा संध्याकाळी. त्यातूनही तुम्हाला हि क्रिया जास्त वेळा करावीशी वाटली तरी करू शकता .

 • अठ्ठेचाळीस दिवसांचा कालावधी - ज्याला सर्व साधारणपणे एक मंडल संबोधिले जाते. एक असा कालावधी ज्या दरम्यान संपूर्ण वातावरण एक आवर्तन पूर्ण करते. कदाचित ह्या कारणास्तव आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये सुद्धा औषध योजना ४८ दिवसांच्या कालावधीसाठी करतात. तुमच्या शरीरांत ह्या औषधांचा परिणाम दिसून येण्याकरिता हा कालावधी आवश्यक असतो. ईशाक्रियेच्या बाबतीत हेच प्रमाण आहे, म्हणून ठराविक कालावधी मध्ये कोठलाही अडथळा न येऊ देता नियमित क्रिया करणे महत्वाचे आहे.

 
 
ISHA FOUNDATION
Isha Foundation - © 1997 - 2023 Isha Foundation. All Rights Reserved.
Site MapFeedbackContact UsInternational Yoga DayGuru Purnima 2019 View our Privacy Policy