Array
 
 
     

“ ईशा म्हणजे निर्मितीचे सूत्र
क्रिया म्हणजे त्या करिता शरीरांतर्गत केलेली हालचाल. ईशाक्रिया हे
असत्या कडून सत्याकडे नेणारे एक साधेसोपे परंतु शक्तिमान अस्त्र आहे.”

- सद्गुरु

माहितीपर चित्रफित ( व्हिडिओ ) बघा.

सद्गुगुरुंच्या वैयक्तिक मार्गदर्शनांत
एक विनामुल्य अध्यात्मचिंतन.


Please let us know your name.


Please let us know your email address.


Please select your country.


Please choose your city


Invalid Input

ईशाक्रिया म्हणजे काय.?

सर्व साधारणपणे अशक्य वाटेल अशा अवघड स्थिति मध्ये शरीर वेडेवाकडे करणे, म्हणजेच "योग " असे आज तरी अनेकांना वाटते. शारीरिक क्रिया- अवस्था हे ह्या योगशास्त्राचे केवळ एक अंग आहे. शरीर आणि मन ह्या दोघांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत नेऊन, संपूर्ण आयुष्य अर्थपूर्ण जगण्याची क्षमता निर्माण करणारे "योग " हे एक तंत्रज्ञान आहे.

अध्यात्मिक्तेचा किमान एक तरी अनुभवातीत क्षण आपल्या प्रत्येकाला मिळावा अशी - एक जाणते योगी आणि स्वामी - अशा सद्गुरुंची ईच्छा म्हणजे साक्षात कृपादृष्टी आहे. कधीकाळी केवळ योगी आणि महात्मे ह्यांनाच ज्ञात असणाऱ्या अध्यात्मिक क्रिया,आता ईशाक्रिया च्या माध्यमातून प्रत्येकास सोयीनुसार आपल्या स्वतःच्याच घरी करणे शक्य होणारा आहे.

योगशास्त्रांच्या कालातीत ज्ञान भांडारातून सद्गुरुंनी एका खूपच सोप्या परंतु अतिशय फायदेशिर अशा योगक्रीयेची योजना केली आहे. ईशा चा संदर्भ निर्मिती सूत्रांशी आहे आणि क्रिया ह्याचा शब्दशः अर्थ आंतरिक घडामोडी असा होतो. मूलतः ईशाक्रिया म्हणजे प्रत्येक प्राणिमात्रास त्याच्या मूळ जीवनसूत्राशी जोडून त्याला स्वतःच्या ईच्छा व अपेक्षेनुसार यशस्वी जीवन जगण्याची क्षमता निर्माण करून देणे,हे आहे. ईशाक्रिया नियमितपणे दररोज केल्यास, शारीरिक आरोग्य, मनःशांती, ओज आणि समाधान प्राप्त होईल. आधुनिकते मुळे गोंधळुन भांबावलेल्या मानसिकतेला सांवरणारे हे एक प्रभावि अस्त्र आहे.

ईशाक्रिया हि एक विनामुल्य, साधी व करण्यास सहजसुलभ योगक्रिया आहे. एक नियंत्रित आत्मचिंतन पद्धत असून सूचक छायाचित्र फितीद्वारे त्याची कॉपी करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनासह उपलब्ध आहे, आणि जो कोणी स्वेच्छेने, नियमितपणे दररोज थोडासा वेळ ह्यासाठी देईल त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलण्याची क्षमता ह्याच्यांत आहे.

 

सद्गुरुंविषयी थोडेसे

संपर्क Isha.Sadhguru.org
संपर्क IshaFoundation.org

सद्गुरु म्हणजे एक गूढ - योगी, कवि, दूरदर्शी,एक आगळेवेगळे लोकोपकारी अध्यात्मिक गुरु आहेत. त्यांचे आयुष्य आणि कार्य ह्या दोन्ही मधून प्रत्येकाला अंतःकरणांतून अपेक्षित मनःशांति आणि समाधान ह्याचा अनुभव मिळण्याची एक परिपूर्ण संधी आहे. हि सद्गुरूंची दूरदृष्टी आहे कि प्रत्येकाला आत्मचिंतनाचा - मनःशांतीचा एक क्षण तरी मिळावा, जेणेकरून त्यांना स्वतःला स्वतःचे भाग्य घडविता येईल आणि आयुष्यांत निश्चित परिवर्तन आणता येईल.

 

नेहमी विचारले जाणारे सर्व प्रश्न

ह्या नेहमी विचारले जाणारे सर्व प्रश्न वाचा.

 

"ईशाक्रिया" विषयी लोक काय म्हणतात ते वाचा.

" सद्गुरु - प्रणाम , मला छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.! मी मागच्या जुलै महिन्यांत 'फ्लोरिडा' मध्ये ईनर इंजिनिरिंगचा कोर्स पूर्ण केला आणि समाधान पूर्वक शांत चित्ताने घरी परत आलो. त्यानंतर डिसेंबर मध्ये गुडघ्याच्या शस्त्रक्रिये पश्चात मला खूपच शारीरिक आणि मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या. परंतु फक्त केवळ ईशाक्रिया ची धानिफित वरचेवर ऐकून मला पूर्वीप्रमाणेच मनःशांती अनुभवास येऊ लागली. "
– गिल जोन्स , युसए.

“ मी नुकतीच सद्गुरुंच्या सानिध्यांत ईशाक्रिया केली आणि त्याचा प्रभाव अनुभवून आश्चर्यचकित झाले. नेटवरून ऑनलाईन व्हिडीओ बघून सुद्धा तसाच अनुभव आला. मला नक्कीच एक आंतरिक शांतता आणि मानसिक समतोल प्राप्त झाला असून, हळूहळू मी भौतिक आकर्षणांपासून विभक्त होत असल्याचा अनुभव येत आहे."
– ओल्गा आव्हिलां ,हौलंड.

पुढे वाचा

आमचे पुरस्कर्ते


 
 
ISHA FOUNDATION
Isha Foundation - © 1997 - 2021 Isha Foundation. All Rights Reserved.
Site MapFeedbackContact UsInternational Yoga DayGuru Purnima 2019 View our Copyright and Privacy Policy